हॅन्डलूम प्रदर्शन पुणेकरांसाठी ३ जुलैपर्यंत खुले : श्रीनिवास राव

विणकर , हातमाग व्यावसायिकांना प्रोत्साहनासाठी इंडियन सिल्क गॅलरीचा पुढाकार-

पुणे : ' आझादी का अमृतमहोत्सव अंतर्गत विशकर कामगारांना हातमाग व्यावसायिकांना आणि हातमागावरील पाना प्रोसाहन देण्यासाठी इंडियन सिटक गॅलरीतर्फे पुण्यात पहिल्यांदाच भव्य हातमाग प्रदर्शनाचे ( बिगेस्ट हॅन्डलूम एक्विविशन ) आयोजन केले आहे . येत्या ३ जुलै २०२२ पर्यंत सकाळी ११ ते ८ या वेळेत सिद्धी बँकेट , डीपी रस्ता , पुणे येथे हे प्रदर्शन सर्वांसाठी मोफत खुल आहे . हातमाग विकास आयुक्तालय , इंडिया हॅन्डलूम , हॅन्डलूम मार्क यांच्या सहकार्यानि एकाच छताखाली हे प्रदर्शन होत आहे . महाराष्ट्रासह अन्य १४ राज्यांतील ६० पेक्षा अधिक हातमाग व्यावसायिक व विणकरांनी यात सहभाग घेतला आहे , अशी माहिती केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सेंट्रल सिल्क बोर्डाचे उपसंचालक ( नि . ) श्रीनिवास राव , अनघा घैसास यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली . श्रीनिवास राव म्हणाले , " देशभरातील विणकरांची कलाकुसर प्रदर्शनाच्या माध्यमातून पुणेकरांसमोर मांडताना आम्हाला आनंद होत आहे . महिला वर्गाच्या सौंदर्यात आणि आकर्षणात भर घालणारे हे प्रदर्शन आहे . कुशल कारागिरांच्या हाताने विणलेल्या कपड्यावर सुंदर आणि मोहक नक्षीदार काम झाले आहे . रेशमी वस्त्रांची फारशी ओळख ग्राहकांना नसते , त्याचा गैरफायदा घेत काही उत्पादक आणि व्यापारी बाजारात बनावट कपड्यांची विक्री करतात . हे टाळून ग्राहकांना शुद्ध आणि हाताने विणकाम केलेल्या साड्या , ड्रेस मटेरियल्स व अन्य कपडे या प्रदर्शनात उपलब्ध करून दिले आहेत . " " ग्राहकांना सिल्क कपड्याबाबत जागरूक करण्यासाठी हे प्रदर्शन उपयुक्त ठरेल . यामध्ये देशाच्या विविध भागात असलेली विशेषता हातमाग , कॉटन , सिल्क , लिनन या कपड्यांच्या माध्यमातून पुणेकरांसमोर ठेवण्याचा प्रयत्न आहे . अतिशय सुंदर कलाकुसर , नक्षी आणि गुणवत्तापूर्ण कपडे उपलब्ध आहेत . महिलांसाठी ही एक अनोखी पर्वणी आहे . आगामी काळातील सण - उत्सव , लग्न समारंभासाठीच्या साड्या असे अनेक पर्याय उपलब्ध केले आहेत . स्वतः कापड विणून विणकामाचा अनुभव घेण्याची संधीही येथे उपलब्ध क रून दिली आहे , " असे श्रीनिवास राव म्हणाले . पश्चिम बंगालच्या बुटीक साठ्या , प्रिंटेड , चंदेरी , पैठणी , माहेश्वरी , बनारसी , गढ़वाल , कलमकरी , कांचीपुरम , करवधी अशा विविध राज्यांची ओळख असलेल्या असंख्य साड्या येथे पाहायला आणि खरेदी करायला मिळणार आहेत . महाराष्ट्रासह उत्तरप्रदेश , बिहार , कर्नाटक , गुजरात , झारखंड , पश्चिम बंगाल , राजस्थान , मध्यप्रदेश अशा विविध भागांतून साड्या , ड्रेस मटेरियल्स व अन्य साहित्याचे स्टॉल लागले आहेत . अधिकाधिक पुणेकरांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा , तसेच विणकरांना प्रोत्साहित करावे , अनघा घेसास यांनी सांगितले .

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने