ब्युरो टीम : ‘देवेंद्र फडणवीसांना मी एक सल्ला देईन. तुम्ही या गोंधळात पडू नका. पुन्हा एकदा सकाळचं जे काही घडलं होतं, ते संध्याकाळचं होऊन जाईल. तुमची जी काही शिल्लक प्रतिष्ठा आहे, ती सांभाळून ठेवा. या गोंधळात तुम्ही पडू नका, फसाल. आमचं आम्ही बघून घेऊ,’ असा सल्लाच शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.
आज सकाळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना संजय राऊतांनी हे वक्तव्य केले. माध्यम प्रतिनिधींनी फडणवीसांच्या बैठकांविषयी विचारणा केली असता संजय राऊतांनी त्यांना यात न पडण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, तुमची उरली सुरली प्रतिष्ठा वाचवा, असं देखील राऊत यावेळी म्हणाले आहेत. आजच्या शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महत्त्वपूर्ण निर्णय होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. राष्ट्रीय कार्यकारिणी कोणत्याही पक्षासाठी फार महत्त्वाची असते. आमच्या कार्यकारिणीच्या बैठकीत अनेक निर्णय होतील. पक्षाच्या भवितव्याविषयी, विस्ताराविषयी चर्चा होईल. काही नव्या नियुक्त्या होतील, असेही राऊत म्हणाले.
टिप्पणी पोस्ट करा