ब्युरो टीम : आज सर्वत्र वटपौर्णिमा साजरी होत आहे. याच पार्श्वभूमीवर भुमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी एक आवाहन केले आहे.
तृप्ती देसाई यांनी म्हटलं की, 'वटपौर्णिमा साजरी करणाऱ्या महिलांनी वडाच्या झाडाच्या तोडलेल्या फांद्यांची पूजा करण्यापेक्षा, एक वडाचे झाड लावून त्याचे कायम पालन पोषण करण्याचा वटपौर्णिमेदिवशी संकल्प करा.
जशी आपल्याला सत्यवानाची सावित्री समजली तशी जोतिबाची सावित्रीही समजली आहे, आणि म्हणूनच सत्यवानाच्या सावित्रीचा जयघोष फक्त वटपौर्णिमेच्या दिवशी केला जातो आणि ज्योतिबाची सावित्री प्रत्येकाच्या हृदयात आहे, आणि म्हणूनच मुली शिकत आहेत, प्रगती करत आहेत, महिला उच्चपदी काम करत आहेत.
ज्या विधवा महिलांची इच्छा वटपौर्णिमेचे व्रत आणि पूजा करण्याची आहे, त्यांनी पुढाकार घेऊन वटपौर्णिमा साजरी करावी, कारण हा सण महिलांचा आहे, फक्त सुवासिनी म्हणून इतरांशी भेदभाव करणाऱ्यांचा नाही, असेही देसाई म्हणाल्या.
टिप्पणी पोस्ट करा