ब्युरो टीम : नॅशनल हेराल्ड गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ने काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना आज पुन्हा चौकशीसाठी बोलावल्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. आज संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्लीतील ईडी कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केलं आहे. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी एकत्र येत, ईडी कार्यालयाबाहेर टायर जाळले आहेत.
ईडीने काल, मंगळवारी राहुल गांधी यांची तब्बल दहा तास चौकशी केली आहे. आज पुन्हा राहुल गांधी यांना चौकशी बोलवण्यात आलं आहे. त्यामुळे संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्लीतील ईडी कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केलं आहे.
https://twitter.com/ANI/status/1536969800911822848?s=20&t=LioC86e1Ow_MRr_cUvLhMw
काही दिवसांपूर्वी ईडीने काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना समन्स जारी केला होता. १३ जून रोजी दिल्ली ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश ईडीकडून देण्यात आले होते. १३ जून आणि १४ जून रोजी चौकशी केल्यानंतर आज पुन्हा राहुल गांधी यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. काल दहा तास चौकशी झाल्यानंतर आज पुन्हा चौकशीसाठी बोलवल्याने काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले असून ईडीच्या कार्यालयाबाहेर तणाव आहे.
टिप्पणी पोस्ट करा