हे तर महाजुमला सरकार, राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल



ब्युरो टीम : मोदी सरकारच्या १० लाख नोकऱ्यांच्या घोषणेवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी टीका केली आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करत हे जुमला नाहीतर महाजुमला सरकार असल्याचं म्हटलंय. राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका करताना जुन्या आश्वासनाची आठवण करुन दिली आहे.
मोदी सरकारनं येत्या दिड वर्षात १० लाख नोकऱ्या देणार असल्याचं जाहीर केलंय. त्यावरून आता केंद्र सरकारवर विरोधी पक्षांनी जोरदार टीका सुरू केली आहे. राहुल गांधी यांनीही या मुद्दयावरुन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. गांधी ट्विट करीत मोदी सरकावर टीका केली आहे. गांधी म्हणतात, नरेंद्र मोदी यांचं सरकार ८ वर्षांपूर्वी सत्तेत आलं, त्यावेळी दरवर्षी २ कोटी नोकरी देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. त्याप्रमाणं आता १० लाख नोकऱ्यांचं आश्वासन देण्यात आलं आहे. हे जुमला सरकार नाही तर महाजुमला सरकार आहे.
दरम्यान, पुढील दीड वर्षांत १० लाख जणांना सरकारी भरती करण्याचे आदेश पंतप्रधान मोदींनी दिले आहेत. हे काम मिशन मोडमध्ये करण्यात येणार आहे. मंगळवारी सकाळी पीएमओ कार्यालयाकडून ट्वीट करण्यात आलं आहे. या ट्विटमध्ये ही घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व विभाग आणि मंत्रालयांमधील मानव संसाधन स्थितीचा आढावा घेतला आणि सरकारने पुढील १.५ वर्षांत मिशन मोडमध्ये १० लाख लोकांची भरती करावी, असे निर्देश दिले, असं या ट्विटमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
एप्रिल महिन्यात पंतप्रधान मोदी यांनी सरकारी अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी विविध सरकारी विभागातील रिक्त पदांची भरती प्रक्रियेला प्रथम प्राधान्य देण्यास सांगितलं होतं. तर, फेब्रुवारीमध्ये राज्यसभेत सादर केलेल्या सरकारी आकड्यांनुसार १ मार्च २०२०पर्यंत केंद्र सरकारमधील विभागात ८७ लाख पद रिक्त आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने