ब्युरो टीम : ‘माननीय शरद पवार साहेब या सर्वांना धमक्या देत आहेत, 'सभागृहात येऊन दाखवा', ते येणारच आहेत. ते येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार. त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठीण होईल,’ असा इशारा वजा धमकीच भाजपचे नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. आमदारांनी बंड केल्यास कार्यकर्ते त्यांच्यामागे जात नाहीत. शिवसैनिक मात्र कायम नेतृत्वाच्या पाठीमागे उभे राहतात. बंडखोरांना पराभूत करण्यासाठी शिवसैनिक जीवाचं रान करतात, हा आतापर्यंतचा इतिहास आहे, असा इशारा देतानाच गुवाहाटीत बसून बहुमत सिद्ध होत नाही. त्यासाठी मुंबईत या, अस पवार म्हणाले. त्यावर नारायण राणे यांनी ट्विट करीत या आमदारांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठीण होईल, अशी धमकीच राणेंनी दिली आहे.
नारायण राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘आघाडी सरकार हे सोयीसाठी व स्वार्थासाठी तयार झालेले सरकार आहे, त्यामुळे कामाच्या व कार्याच्या बढाया मारू नयेत. काहीजणांनी अनेक वेळा बंडखोरी केली. त्या बंडखोरीचा इतिहास उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. नको त्या क्षणी नको त्या वयात मान्यवरांना धमक्या देणे शोभत नाही,’ असे सांगतानाच राणे यांनी म्हंटलय की, ‘संजय राऊत तुमचे (शिवसेना) किती आमदार राहिलेत? मतदानाची अपेक्षा करू नका, पराभवाची करा.’ तसेच माननीय शरद पवार साहेब या सर्वांना धमक्या देत आहेत, 'सभागृहात येऊन दाखवा', ते येणारच आहेत. ते येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार. त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठीण होईल, असेही राणे यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
टिप्पणी पोस्ट करा