शाब्बास एकनाथजी, नाही तर लवकरच तुझा ...


ब्युरो टीम : शाब्बास एकनाथजी, ….नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता”; असे ट्विट भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले आहे. राणेंच्या या ट्विटची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. मात्र, या ट्विटच्या माध्यमातून शिवसेनेवर राणे यांनी निशाणा साधला आहे. 
राज्यसभेनंतर विधान परिषद निवडणुकीतही भाजपाने महाविकास आघाडीला धक्का दिला. यानंतर राज्यातील महाविकासआघाडीचं सरकार धोक्यात येणार असे अनेक दावेही करण्यात येत आहेत. अशातच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे संपर्काच्या बाहेर आहेत. त्यामुळे राज्यात राजकीय भूकंप होणार असल्याच्या चर्चेला उधाण आलंय. शिवसेनेकडून वारंवार एकनाथ शिंदेंसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान एकनाथ शिंदे गुजरातमधील सूरतमध्ये असून त्यांच्यासोबत १५ ते २५ आमदार असल्याचं सांगितलं जात आहे. शिवसेनेचे रायगडमधील तिन्ही आमदारही संपर्क क्षेत्राबाहेर असून ते एकनाथ शिंदेंसोबत असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. एकनाथ शिंदे संपर्काबाहेर असल्याने त्यांनी बंड पुकारल्याचे तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र, या प्रकारानंतर शिवसेनेसमोर मोठे संकट उभे राहिले आहेत. त्यातच आता भाजप नेते नारायण राणे यांनी एक ट्विट करीत शिंदे हे भाजपसोबत येऊ शकतात, असा संदेशच दिला आहे. 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने