पुणे : एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी हे सातत्याने भाजपवर जोरदार तोफ डागत असतात. मात्र, भाजपच्या एका खासदाराने ओवीसी यांचे चक्क कौतुक केले आहे. विशेष म्हणजे ओवीसी यांच्या भाषणाचा व्हिडिओ सुद्धा त्यांनी ट्विट केला आहे.
बेरोज़गारी आज देश का सबसे ज्वलंत मुद्दा है और पूरे देश के नेताओं को इस मुद्दे पर सरकार का ध्यान आकृष्ट कराना चाहिए। बेरोज़गार नौजवानों को न्याय मिलना चाहिए,तभी देश शक्तिशाली बनेगा।
— Varun Gandhi (@varungandhi80) June 13, 2022
मैं आभारी हूँ की रोजगार के ऊपर उठाए गए मेरे सवालों का @asadowaisi जी ने अपने भाषण में ज़िक्र किया। pic.twitter.com/MAqfTOtHKZ
उत्तर प्रदेशातील भाजपा खासदार वरुण गांधी यांनी आज ट्विटरवर एक व्हिडिओ ट्विट करीत ओवेसी यांचे आभार मानले आहेत. रोजगार डेटा नमूद केल्याबद्दल वरूण गांधींनी ओवेसींचे आभार मानले. या व्हिडिओमध्ये ओवेसी म्हणताना दिसतात की, देशात केंद्र आणि राज्य सरकारची ६० लाखांहून अधिक मंजूर पदे रिक्त आहेत, तर बेरोजगारी विक्रमी पातळीवर आहे. ओवेसी त्यांच्या भाषणाच्या व्हिडिओमध्ये विभागनिहाय रिक्त पदांची संख्या वाचताना दिसतात. एवढचं नाही तर हा त्यांचा डेटा नसून भाजपा खासदार वरुण गांधी यांनी उपलब्ध करून दिला असल्याचे ते सांगतात. तर, दुसरीकडे वरुण गांधी यांनी हा व्हिडिओ ट्विट करताना म्हंटले आहे की, ‘बेरोजगारी हा आज देशातील सर्वात ज्वलंत प्रश्न असून संपूर्ण देशातील नेत्यांनी या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधले पाहिजे. बेरोजगार तरुणांना न्याय मिळाला पाहिजे, तरच देश शक्तिशाली होईल. असदुद्दीन ओवेसींनी त्यांच्या भाषणात रोजगारावर उपस्थित केलेल्या माझ्या प्रश्नांचा उल्लेख केल्याबद्दल मी आभारी आहे.’
दरम्यान, वरुण गांधी यांनी ओवेसी यांचे कौतुक केल्यामुळे या प्रकाराची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा आहे.
टिप्पणी पोस्ट करा