पोट निरोगी ठेवायचय? मग आहारात आजच करा 'या' पदार्थ्यांचा समावेश

ब्युरो टीम :  तुमच्या पोटाचे आरोग्य जितके चांगले असेल, तितके तुमच्या शरीराचे आरोग्य चांगले राहील. पोटात काही चांगले बॅक्टेरिया असतात, जे जीवनसत्त्वे तयार करून तुम्हाला निरोगी ठेवतात. तसेच रोगप्रतिकारक शक्ती  वाढवतात. शरीरातील हानिकारक जीवाणू नष्ट करतात. पचनशक्ती मजबूत राहते. त्यामुळेच तज्ज्ञ सल्ला देतात की, आहारात पोट आणि आतडे निरोगी ठेवणाऱ्या पदार्थांचा समावेश करावा. निरोगी आहारामुळे तुमच्या आतड्याचे  आरोग्य सुधारते.  चला तर आज आम्ही तुम्हाला अशाच काही पदार्थांबद्दल सांगत आहोत, जे पोटाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत.

हिरव्या पालेभाज्या भरपूर  खा

ब्रोकोली, पालक यासारख्या हिरव्या पालेभाज्यांमध्ये खनिजे, जीवनसत्त्वे, फायबर, लोह इत्यादी मुबलक प्रमाणात असतात. त्यांचे अधिक सेवन केल्यास पोटाचे आरोग्य दीर्घकाळ चांगले राहते. फायबरयुक्त हिरव्या भाज्यांचे अधिक सेवन केल्याने आतड्याचा एक चांगला आणि निरोगी मायक्रोबायोम विकसित होतो.

 अँटी इंफ्लेमेटरी पदार्थ खा

जेव्हा तुमचे शरीर संक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी पांढऱ्या रक्त पेशी आणि इतर घटक स्रावित करते, तेव्हा जळजळ होते. अशा परिस्थितीत अँटी इंफ्लेमेटरी पदार्थ भरपूर प्रमाणात खा, कारण ते जळजळ कमी करतात. जीवनसत्त्वे, खनिजे, ओमेगा-3 फॅटी ॲसिड इत्यादी शरीरात नैसर्गिक अँटिऑक्सिडंट्स म्हणून काम करतात. त्यामुळे पोटाचे आरोग्य चांगले राहते. तसेच, व्यायाम, योगासने हे सुद्धा आतड्यांचे आरोग्य चांगले ठेवते.


आहारात तृणधान्यांचा करा समावेश

पिंकविलामध्ये प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टनुसार, आहारात तृणधान्यांचा  समावेश करा. ते पचनशक्ती उत्तम ठेवतात. त्यांच्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे आतड्याची हालचाल योग्य राहते. बद्धकोष्ठतेची समस्या टाळण्यास मदत होते. या धान्यामध्ये फायबर सोबतच  अँटिऑक्सिडंट्स, मायक्रोन्यूट्रिएंट्स यांचे प्रमाणही जास्त असते. यामध्ये असलेले फायबर आतड्याच्या आरोग्यासाठी चांगले आहे, कारण ते प्रीबायोटिक सारखे काम करतात. पोटात असलेल्या चांगल्या बॅक्टेरियासाठी हे आवश्यक असतात.

फायबर युक्त फळे आणि भाज्या खा

तुम्ही जितकी जास्त फायबर युक्त फळे आणि भाज्यांचे सेवन कराल, तितके पोटाचे आरोग्य चांगले राहील. यामुळे पोट लवकर साफ होईल आणि आतड्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. प्रोबायोटिक्स आणि प्रीबायोटिक्स असलेले पदार्थ खा. ते पोटात असलेल्या सूक्ष्मजंतूंना सपोर्ट करतात. दही, ब्लूबेरी, तृणधान्य, बिया, भाज्या, फळे इत्यादी खा.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने