ब्युरो टीम : शिवसेनेच्या याचिकेवर आज सायंकाळी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार असून त्यावर लगेच निर्णय येण्याची शक्यता आहे. त्यामुळे विधानभवनात उद्या ठाकरे सरकारला बहुमताची परीक्षा द्यावी लागणार का, हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे. दरम्यान, दुसरीकडे भाजपच्या गोटात वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी महत्त्वाची बैठक सुरु झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकिय निवासस्थानी होत असलेल्या या बैठकीला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, सुधीर मुनगंटीवार, प्रवीण दरेकर, आशिष शेलार, गिरीश महाजन तसेच भाजप आमदारही उपस्थित आहे. या बैठकीत उद्या होणाऱ्या बहुमताच्या चाचणीविषयी आणि भाजपच्या रणनितीविषयी चर्चा होत आहे. जवळपास ४० मिनिटांपासून भाजप नेत्यांमध्ये खलबतं सुरु आहेत आज सायंकाळच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडेही भाजप नेत्यांचं लक्ष आहे. याच निर्णयाच्या अनुषंगाने भाजपच्या बैठकीत चर्चा होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्यासह सगळे बंडखोर आमदार उद्या मुंबईत दाखल होणार असल्याने सुरक्षेचा मोठा प्रश्न आहे. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर विधानभवनाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच भाजपच्या सर्व आमदारांना पुढच्या काही तासांत मुंबईत हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
टिप्पणी पोस्ट करा