संजय राऊत म्हणाले, फडणवीसांची प्रकृती ठणठणीत असती तरी...

मुंबई : ‘देवेंद्र फडणवीसांना करोना झाला आहे. मी नेहमी प्रार्थना करतो की ते लवकरात लवकर बरे व्हावेत. ते राज्याचे विरोधीपक्ष नेते आहेत. आमचे एकेकाळचे सहकारी आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीला आराम व्हावा, अशी प्रार्थना. पण, जरी त्यांची प्रकृती ठणठणीत असती तरीही निवडणूक आम्हीच जिंकत होतो आणि जिंकणार आहोत, हे लक्षात घ्या", असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि फडणवीसांना डिवचलं आहे.
राज्यसभेच्या निवडणुकीपूर्वी शिवसेनेने आपल्या सर्व आमदारांना मुंबईतील हॉटेल ट्रायडंट येथे ठेवलं आहे. आज तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत म्हणजेच काँग्रेसचे मल्लिकार्जून खर्गे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सायंकाळी साडे सहा वाजता आमदारांची बैठक घेणार आहेत. त्यापूर्वी राऊत यांनी या बैठकीबाबत माहिती दिली. यावेळी राऊतांना देवेंद्र फडणवीसांबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी, 'फडणवीसांची प्रकृती ठणठणीत असती, तरी आम्हीच जिंकलो असतो', असं म्हणत फडणवीसांना डिवचलं आहे.
दरम्यान, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना करोनाची लागण झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: ट्विट करून ही माहिती दिली. माझी करोना टेस्ट पॉझिटिव्हि आली आहे. मी सध्या होम आयसोलेशनमध्ये आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार माझे उपचार आणि औषधपाणी सुरु आहे. गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वत:ची कोरोना चाचणी करुन घ्यावी, असे फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने