अशाच लोकांच्या आशिर्वादावर पक्ष उभा राहिलाय, मनसेचे प्रवक्ते योगेश खैरे


MNS: अशाच लोकांच्या आशिर्वादावर पक्ष उभा राहिलाय, रिक्षा चालक, भाजी विक्रेते, पान टपरीवाल्यांच्या नावानं अपमान करायला मनसेचा विरोध
मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेच्या आमदारांनी केलेल्या बंडाला ठाकरेंसह संजय राऊतांकडून जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. संजय राऊत अनेकदा आक्रमक भाषा वापरत आहेत. हे आमदार राजकारणात येण्याआधी काय करायचे त्याचा पाढा वाचत आहेत. शिवाय बंड केल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा ते आधी जे काम करायचे तेच काम करायला पुन्हा पाठवू, असं संजय राऊत म्हणाले. त्यावर आता मनसेनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. “तुमच्या राजकीय वादात रिक्षा चालक, भाजी विक्रेते, पान टपरी चालवणारे अशा सर्वसामान्य आणि गरीब वर्गातील लोकांचा अपमान करू नका.गुवाहाटीतील आमदारांना परत ते काम करायला पाठवू, असं शिवसेना का म्हणत आहे. हे काम हीन आहे का? अशाच लोकांच्या आशीर्वादावर पक्ष उभा राहिला हे विसरू नका!” असं ट्विट मनसेचे (MNS) प्रवक्ते योगेश खैरे (Yogesh Khaire) यांनी केलं आहे.

योगेश खैरे यांचं ट्विट

“तुमच्या राजकीय वादात रिक्षा चालक, भाजी विक्रेते, पान टपरी चालवणारे अशा सर्वसामान्य आणि गरीब वर्गातील लोकांचा अपमान करू नका.गुवाहाटीतील आमदारांना परत ते काम करायला पाठवू, असं शिवसेना का म्हणत आहे. हे काम हीन आहे का? अशाच लोकांच्या आशीर्वादावर पक्ष उभा राहिला हे विसरू नका!” असं ट्विट योगेश खैरे यांनी केले आहे. 

बंडखोर आमदारांना आव्हान देताना संजय राऊतांनी आक्रमक भाषा वापरली. हे आमदार सर्वसामान्य घरातले आहेत. त्यांना शिवसेनेने मोठं केलं. त्यांना आमदारकी दिली अन् आता ते थेट ठाकरेंना आव्हान देत आहेत? आम्ही त्यांनी विधानभवनात पाय ठेवू देणार नाही, यापैकी काही लोक रिक्षा चालवायचे, काही भाजी विकायचे कुणी पान टपरी चालवायचं. त्यांना पुन्हा तीच कामं करायचा लावू असं राऊत म्हणाले. त्यावर हा या व्यावसायिकांचा अपमान आहे, असं मनसेचं म्हणणं आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने