पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात बारावीचा निकाल उद्या, ८ जून रोजी जाहीर होणार आहे. दुपारी एक वाजता हा निकाल जाहीर केला जाईल. त्याबाबत बोर्डाकडून अधिकृत अधिसूचना जारी केले गेले आहे.
महाराष्ट्रात दरवर्षी सुमारे १४ लाख विद्यार्थी एचएससी परीक्षेला बसतात. गेल्या वर्षी कोरोना विषाणूमुळे महाराष्ट्र बोर्डाने दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यांकन आणि चाचणीच्या आधारे उत्तीर्ण करण्यात आले. मात्र यंदा बोर्डाच्या परीक्षा दरवर्षीप्रमाणेच झाल्या, त्यामुळे विद्यार्थी निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
येथे पहा निकाल
msbshse.co.in
hscresult.mkcl.org
mahresult.nic.in.
असा पहा निकाल
महाराष्ट्र बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम MSBSHSE च्या अधिकृत वेबसाईट maharesult.nic.in किंवा hscresult.mkcl.org किंवा msbshse.co.in वर जा.
होमपेजवर, MSBSHSE १२वी निकाल २०२२ या लिंकवर क्लिक करा, निकाल जाहीर होताच लिंक सक्रिय होईल.
तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख एंटर करा, कॅप्चा टाका आणि सबमिट वर क्लिक करा.
तुमचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल, तुम्ही खाली डाउनलोड करून सेव्ह करून डेस्कटॉपवर सेव्ह करू शकता.
टिप्पणी पोस्ट करा