उद्धव ठाकरे म्हणाले, काय तुमचं कर्तृत्व? हिंमत असेल तर...



ब्युरो टीम : 'काय तुमचं कर्तृत्व? हिंमत असेल तर स्वत:च्या बापाच्या नावाने मतं मागा', असं परखड  वक्तव्य शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. पदाधिकाऱ्यांना उद्देशून त्यांनी भाषण केलं. यावेळी त्यांनी बंडखोर शिवसेना आमदारांना आणि एकनाथ शिंदे यांना देखील सुनावलं आहे.
उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. 'आधी नाथ होते, आता दास झाले. बंडखोरांनी त्यांचा निर्णय घ्यावा. बाळासाहेबांचं नाव दुसऱ्यांना वापरता येणार नाही. शिवसेना निखारा आहे. पाय ठेवाल तर जळून जाल, असे सांगताना उद्धव ठाकरेंनी यावेळी त्यांची पक्षप्रमुख पदावर निवड झाली तेव्हाची आठवण सांगितली. तेव्हा पक्षांतर्गत नाराजीविषयी बोलताना बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली भूमिका त्यांनी सांगितली. 'मी बाळासाहेबांना म्हणालो हे सगळे काय करतायत ते तुम्ही तरी थांबवा. ते मला म्हणाले मी मध्ये नाही पडणार. त्यांचा निर्णय त्यांना घेऊ दे. मग शेवटी तो ठराव मंजूर झाल्यानंतर शिवसेना प्रमुखांनी सगळ्यांना विचारलं होतं की हे जे सगळं केलंय, ते तुम्हाला मान्य आहे का?' असं उद्धव ठाकरे म्हणाले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने