मराठी प्रिंट रिसर्च टीम : विधानपरिषद निवडणुकीसाठीच्या भाजपने पाच उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली. प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, राम शिंदे, उमा खापरे आणि श्रीकांत भारतीय यांना भाजपने विधान परिषदेची उमेदवारी जाहीर केली.
या पाच जणांपैकी दरेकर, लाड, शिंदे व खापरे ही चार नावे सामान्यांना माहिती असलेली नावे आहेत. पण श्रीकांत भारतीय कोण याविषयी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, श्रीकांत भारतीय हे एकेकाळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पीए (ओएसडी) होते. पीए ते विधानपरिषदेचे तिकीट असा त्यांचा प्रवास हा थक्क करणारा आहे.
श्रीकांत भारतीय हे भाजपचे प्रदेश सरचिटणीस आहेत. अभ्यासू पदाधिकारी म्हणून त्यांची पक्षात इमेज आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना भारतीय हे त्यांचे ओएसडी अर्थात पीए होते. फडणवीसांच्या अतिशय जवळचे आणि विश्वासू म्हणून भारतीय यांची ओळख आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीवेळी ते भाजपच्या वॉररुमचे प्रमुख होते.
श्रीकांत भारतीय यांना विधानपरिषदेची उमेदवारी मिळाल्यामुळे या नावाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आता ही निवडणूक जिंकून ते आमदार होणार का, याकडे लक्ष लागले आहे. कारण विधानपरिषदेला भाजपला चार उमेदवार निवडून आणणे, सहज शक्य आहे. मात्र, एक जागा निवडून आणण्यासाठी भाजपला चांगलाच संघर्ष करावा लागणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा