राज ठाकरे संदर्भातील प्रश्न विचारल्यावर आदित्य ठाकरे म्हणाले....


ब्युरो टीम : शिवसेना नेते आदित्य ठाकरे अयोध्या दौऱ्यावर आहेत. अयोध्यामध्ये त्यांनी पत्रकार परिषद सुद्धा घेतली. यावेळी त्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसंदर्भात प्रश्न विचारला असता, 'कोण कुणाचं स्वागत करतंय, कोण कुणाला विरोध करतंय, यापेक्षा मंदिर निर्माणाबाबत बोलायला हवं,'असं सांगत अधिक भाष्य करणं टाळलं. 
आदित्य ठाकरे म्हणाले, 'अयोध्येतील जनता आमचं स्वागत करत आहे. हा श्रद्धेचा विषय आहे, राजकारणाचा आणि निवडणुकीचा नाही. गेल्या तीन चार वर्षात चौथ्यांदा अयोध्येत आलो आहे. रामजन्मभूमीत रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी हजारो शिवसैनिक आले आहेत. आमच्या सोबत जो उत्साह आहे, जल्लोष आहे तो आपण देशाला दाखवावा,' असेही ते म्हणाले.
'आम्ही इथं राजकारणासाठी येत नाही, श्रद्धेचा विषय असल्यानं येतो,' असं सांगतानाच ते म्हणाले,
'आज सकाळी महंतांबरोबर बोलण झालं. आज अयोध्येत आहोत अयोध्येची चर्चा करुया. संसदेनं विशेष कायदा करुन राम मंदिर उभारावं अशी भूमिका होती. मात्र, तस झालं नाही. कोर्टाच्या आदेशानं मंदिर उभारलं जात आहे, त्याचा आनंद आहे.शक्ती आणि भक्ती आमच्यासाठी एकच आहे. आमच्या भक्तीतच आमची शक्ती आहे. हाच आमचा धर्म आहे, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने