कोणत्या प्रश्नावर अजित पवार भडकले, वाचा



ब्युरो टीम : 'सरकार अल्पमतात आहे का, हे विधीमंडळाच्या कामकाजा संबंधित निर्णय विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष घेतील. सरकार म्हणून आम्हाला त्यात बोलण्याचा काडीचाही अधिकार नाही. मात्र तिथे गेलेले (गुवाहटी) आम्ही शिवसेना आहोत, असं सांगत आहेत. ते जर शिवसेनेचे आहेत तर आमच्याकडे बहुमत आहे. कारण मुख्यमंत्रीही शिवसेनेचे आहेत, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
दरम्यान, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे भाजपचा हात दिसत नाही, असं वक्तव्य  अजित पवार यांनी काल केलं होतं. त्यावर बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र बंडाला भाजपची फूस असल्याचं स्पष्ट करत अजितदादांना बाहेरची परिस्थिती माहित नसावी, अशी प्रतिक्रिया दिल्याने पवार काका-पुतण्यात एकमत नसल्याची चर्चा रंगली होती. यावर अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे. शरद पवार साहेब हे आमचं दैवत आहेत, त्यांच्या स्टेटमेंटवर प्रतिक्रिया देण्याची माझी लायकी नाही, असं अजित पवार म्हणाले.
सर्व मंत्री ठाकरेंना सोडून शिंदे गटाकडे जात असल्याच्या प्रश्नावर अजित पवार भडकले. कोण मंत्री जात आहेत? उद्धव ठाकरे इथे आहेत, अजित पवार इथे आहेत, राजेश टोपे, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, वर्षा गायकवाड सगळे इकडे आहेत, असं म्हणत अजित पवारांनी कॅबिनेटमधील प्रमुख मंत्र्यांची यादीच वाचून दाखवली. २५ पक्षांसह अटलबिहारी वाजपेयी यांनी एनडीएप्रणित सरकार चालवलं होतं. त्यानंतर १० वर्ष मनमोहन सिंह यांनी अनेक पक्षांसह सरकार चालवलं. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये तीन पक्षात कुठलेही मतभेद नाहीत, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने