ब्युरो टीम: ‘आपल्या आशिर्वादाने आणि प्रार्थनेने माझी शस्त्रक्रिया व्यवस्थिरतरित्या पार पडली! काही वेळापूर्वीच रुग्णालयामधून बाहेर पडून मी घरी पोहोचलो आहे. आपले आशिर्वाद आणि प्रेम असेच कायम असो!’ असे ट्विट मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे मागील काही काळापासून हीप बोन या आजाराने त्रस्त आहेत. पुण्यातील एका सभेतून त्यांनी याबाबतची माहिती दिली होती. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. मात्र, करोनाची लागण झाल्यामुळे ती पुढे ढकलण्यात आली. अखेर काही दिवसांपूर्वी लीलावती रुग्णालयात राज ठाकरेंवर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर आता राज ठाकरे आपल्या घरी परतले आहेत. राज ठाकरेंनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.
दरम्यान, मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्यावर लीलावती रुग्णालयात यशस्वीपणे शस्त्रक्रिया पार पडली होती. लीलावती रुग्णालयातील ज्येष्ठ शल्यविशारद डॉ. विनोद अग्रवाल आणि त्यांच्या वैद्यकीय सहकाऱ्यांनी ही शस्त्रक्रिया केली.
टिप्पणी पोस्ट करा