येत्या आषाढीला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून पूजा करतील- राधाकृष्ण विखे-पाटील

  ब्युरो टीम : महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरतेला सुरुवात झाली ती विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर, निकाल लागताच शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी सेनेलाच धोका देत बंडखोरी केली. त्यांच्या पाठोपाठ इतर सेना नेत्यांनीही शिंदेंच्या पाऊलावर पाऊल ठेवत सेनेशी बंडखोरी केली. या बंडखोरीमुळे सेनाच नाही तर मविआ सरकारलाही मोठा धक्का बसला आहे. इतका मोठा धक्का कि, आज सरकार बहुमत सिद्ध करण्याच्या मार्गावर येऊन ठेपली आहे.
मात्र यात भाजपचा काय संबंध? तर भाजपच्या अनेक नेत्यांनी या बंडखोरीला समर्थन दिले. या दिवसापासून भाजपकडून अनेक दावे-प्रतिदावे केले गेले. अशातच आता भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी या सत्तानाट्ट्यावर प्रतिक्रिया दिली आहे. “संजय राऊत हा महत्त्वाचा मुद्दा नाही. तो यापूर्वीही नव्हता आणि आत्ताही नाही. त्यांचं काय करायचं हा निर्णय उद्धव ठाकरेंनी घ्यायचा आहे. अस राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले आहेत.
“शिवसेनेचं महाराष्ट्रातलं अस्तित्व संपत आहे आणि अतिशय स्वाभिमानी मंडळी एकनाथ शिंदे यांच्या निमित्ताने पुढे येत आहेत. राज्याला चांगलं सरकार देण्याची त्यांची तयारी झाली आहे. भाजप म्हणून आता आमची वेट अँड वॉच ची भूमिका आहे” असं देखील  विखे-पाटील यांनी सांगितलं.
त्याबरोबरच २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जनाधार हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला मिळाला होता. महाविकास आघाडीचे सरकार हे विश्वासघात करून तयार झाले असल्याची टीका राधाकृष्ण विखे-पाटील यांनी यावेळी केली. “जे विश्वासघात करतात तेच विश्वासघाताची भाषा करतात  हे त्यांना शोभत नाही” असा टोला महाविकास आघाडीला त्यांनी लगावला. “ते पायउतार होतील असा विश्वास सामान्य जनतेच्या भाजप कार्यकर्त्यांच्या मनात आहे. येत्या आषाढीला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील आणि तेच पूजा करतील” असा विश्वास राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केला.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने