पावसाची वाट पाहताय? मग हे वाचाच..



ब्युरो टीम : राज्यात  मुंबईसह अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये पाऊस गायब झाला आहे. अशात हवामान खात्याकडून पुढच्या ५ दिवसांमध्ये विदर्भासह अनेक भागात गडगडाटी वादळ आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे या अंदाजानुसार तरी पाऊस होणार का? हे पाहावं लागेल.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, १९ जून रोजी विदर्भात तर १५ ते १७ जून दरम्यान पूर्व मध्य प्रदेशात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नैऋत्य मान्सून आज १५ जून २०२२ रोजी मराठवाडा, संपूर्ण कर्नाटक आणि रायलसीमा आणि तामिळनाडू, किनारी आंध्र प्रदेशचा काही भाग, वायव्य आणि पश्चिम मध्य बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात पुढे सरकला आहे.विदर्भ आणि तेलंगणा, आंध्र प्रदेशचा काही भाग, पश्चिम मध्य आणि वायव्य बंगालचा उपसागर, ओडिशाचा काही भाग, गंगेचा पश्चिम बंगाल, झारखंड, संपूर्ण उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि आणखी काही भागात मान्सून पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. तर पुढील २-३ दिवसांत बिहारच्या काही भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने