मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस’ भाजपाची बॅनरबाजी



ब्युरो टीम :  औरंगाबादमध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असतील अशा शुभेच्छा देणारे बॅनर्स लागले आहेत. भाजपाकडून झळकावण्यात आलेल्या या बॅनर्सवर ‘हे माऊली तुझा कृपा आशिर्वाद सदैव राहू दे तुझ्या पंढरपुच्या पूजेला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी येऊ दे’ असा मजकूर लिहिण्यात आला आहे. तर, दुसरीकडे राष्ट्रवादीचे  शरद  पवार यांनी आमदारांची बैठक  घेतली आहे. त्यामुळं  राज्यात सुरु असणाऱ्या अभूतपूर्व राजकीय संघर्ष अधिकच  तीव्र होताना दिसतोय
औरंगाबादमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर्स लागले आहेत. तर दुसरीकडे मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना संघर्षासाठी तयार राहा असा इशारा दिला आहे. त्यामुळे राज्यातील संघर्ष अधिक चिघळण्याची चिन्हं दिसत आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने