राज ठाकरे नवीन शिवसेना प्रमुख ?, फुटलेल्या गटाचे स्वीकारणार नेतृत्व ?, सोशल मीडियावर चर्चेला उधाण.


          एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यात सत्तासंघर्ष सुरू झाला आहे. आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार त्यांच्या बरोबर ४१ पेक्षा जास्त आमदार गुवाहाटीला पोचल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंसमोर दुहेरी संकट निर्माण झालं आहे. पक्ष आणि सरकार वाचवण्याचं आव्हान ठाकरेंसमोर आहे.
          शिवसेनेचे वरिष्ठ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाला वाढता प्रतिसाद मिळताना दिसत आहे. माझ्यासोबत ४१ आमदार आहेत आणि आणखी आमदार येतील, असा दावा शिंदेंनी काल केला होता. त्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील, चंद्रकांत पाटील हे नेते शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना धक्का बसला. आता सेनेचे जे आमदार नॉट रिचेबल झाले होते त्यातील काही जण गुवाहाटीला पोचल्याची माहिती समोर येत आहे.
          आता शिंदेंबद्दल सॉफ्ट कॉर्नर असलेल्या आमदारांची संख्या वाढत जात असुन मुंबईतील आमदारही शिंदेंच्या गटात सामील होऊ लागले आहेत. लवकरच शिंदे यांचा शिवसेनेनतून फुटलेला गट, आपणच खरी शिवसेना आहे हा कायदेशीर दावा करणार आहे. जर त्यांचा हा दावा मान्य झाला तर राज ठाकरे या नवीन शिवसेनेचे नेतृत्व स्वीकारणार अशी चर्चा सोशल मीडियात सुरु झाली आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने