१६ दिवसात मोडला निरजने स्वत:चा विक्रम आणि जिंकले पदक


ब्युरो टीम : टोकियो ऑलिंम्पिकमध्ये सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा ने पुन्हा एकदा इतिहास घडवला आहे. स्टॉकहोम डायमंड लीगमध्ये नीरजने ८९.९४ मीटर लांब थ्रो केला. याआधी १४ जून रोजी नीरजने पावो नुरमी गेम्समध्ये ८९.०३ मीटर लांब थ्रो केला होता. आता त्याने पुन्हा एकदा नवा राष्ट्रीय विक्रम केला. 
नीरजने स्वत:चा राष्ट्रीय विक्रम मोडला पण त्याला सुवर्णपदक जिंकता आले नाही. ग्रेनेडाच्या पीटर्स एडरसनने सुवर्ण जिंकले. २४ वर्षीय पीटर्सने ९०.३१ मीटर लांब थ्रो केला. त्यामुळे नीरज दुसऱ्या क्रमांकावर राहिला आणि त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. नीरज चोप्राचे डायमंड लीगमधील हे पहिले पदक आहे. याआधी त्याची सर्वोत्तम कामगिरी चौथा क्रमांक होता. जर्मनीच्या ज्युलियान वेबरने ८९.०८ मीटर लांब थ्रो करत कांस्यपदक जिंकले. आता १५ ते २४ जुलै दरम्यान होणाऱ्या वर्ल्ड एथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये नीरज आणखी एक पदक जिंकण्याची संधी आहे. 

पहिल्याच प्रयत्नात मोडला राष्ट्रीय विक्रम मोडला

नीरज चोप्राने त्याच्या पहिल्याच प्रयत्नात ८९.९४ मीटर लांब थ्रो करीत राष्ट्रीय विक्रम मोडला. दुसऱ्या प्रयत्नात नीरजचा थ्रो ८४.३७, तिसरा थ्रो ८७.४६, चौथा थ्रो ८४.६७, पाचवा थ्रो ८६.६७ तर सहावा थ्रो ८६.८४ मीटर फेकला. या सहा थ्रो मध्ये नीरजने एकही फाऊल थ्रो केला नाही. ऑलिंम्पिक झाल्यानंतर नीरजही तिसरी स्पर्धा होती.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने