शिवसैनिक झाले आक्रमक, श्रीकांत शिंदे यांचे कार्यालय फोडले




ब्युरो टीम :शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेनेच्या ३५ पेक्षा जास्त आमदारांनी एकनाथ शिंदेंना समर्थन दिले आहे. त्यामुळे शिंदें विरुद्ध उद्धव ठाकरे अशी स्थिती सध्या पहायला मिळत आहे. बंडामुळे आता शिवसेनेचे कार्यकर्तेही एकनाथ शिंदेवर नाराज झाले आहेत. आक्रमक झालेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सेनेच्या बंडखोर आमदारांचे कार्यालय फोडणे सुरू केले आहे.
आज सकाळी पुण्यात आमदार तानाजी सावंत यांचे कार्यालयाची तोडफोड करण्यात आल्यानंतर, शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे जे आता एकनाथ शिंदे यांचे पुत्र आहेत, त्यांचे उल्हासनगर येथील कार्यालय फोडण्यात आले आहे.
या घटनेनंतर उल्हासनगरात एकच खळबळ उडाली आहे. मंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर हे एक महत्त्वाचे शहर आहे. डोंबिवलीनंतर उल्हासनगर शहरात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे कार्यालय आहे. सिंधीबहुल असलेल्या उल्हासनगर शहरात खासदार शिंदे यांना चांगले मताधिक्य मिळाले. तर अडीच वर्षांपूर्वी हातातून निसटलेली पालिकेतील सत्ताही खासदार शिंदे यांच्या माध्यमातून परत मिळाली होती.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने