ब्युरो टीम : राष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर विरोधकांकडून संयुक्त उमेदवार उभा करण्यासाठी जोरदार हालचाली सुरु आहेत . याच पार्श्वभूमीवर दिल्लीत विरोधी पक्षाच्या नेत्यांची आज बैठक झाली.
दरम्यान, या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी विचारणा केल्याची माहिती आहे . मात्र शरद पवारांनी उमेदवारीसाठी स्पष्टपणे नकार दिल्याची माहिती मिळत आहे .
आज, दिल्लीत झालेल्या बैठकीत ममता बॅनर्जी आणि शरद पवारांसोबत माजी पंतप्रधान देवगौडा, मल्लिकार्जून खरगे, अखिलेश यादव, मेहबुबा मुफ्ती, सुभाष देसाई, ई करीम, जयराम रमेश, प्रफुल्ल पटेल, टी. आर. बालू , यशवंत सिन्हा, रणदीप सुरजेवाला, प्रियंका चतुर्वेदी, उमर अब्दुल्ला, राजा आदी १८ नेते उपस्थित होते. ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी संध्याकाळी शरद पवारांची भेट घेतली होती. बैठक सुरु होताच ममता बॅनर्जी यांनी शरद पवारांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. मात्र, शरद पवारांनी उमेदवारीला नकार दिल्याची माहिती आहे.
टिप्पणी पोस्ट करा