राज ठाकरेंचे ते पत्र चर्चेत, कारणही तसचं....



ब्युरो टीम : महाविकास आघाडी सरकार स्थापन करुन अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे उद्धव ठाकरे यांना काल मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर मात्र राज ठाकरें यांनी सुमारे दीड महिन्यांपूर्वी ट्विट केलेले एक पत्र चर्चेत आले आहे.  सत्ता येत- जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही! असं राज यांनी पत्राच्या शेवटी म्हटलं होतं.
१० मे रोजी राज यांनी एक ट्विट केलं होतं. त्यावेळी मशिदीवरील भोंग्यांचा विषय चर्चेत होता. राज यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. मशिदीवरील भोंग्यांविरोधात आंदोलनं करणाऱ्या, मशिदींसमोर हनुमान चालिसा लावणाऱ्या मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यावरून राज यांनी एका पत्राच्या माध्यमातून ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली होती.
राज्य सरकारला माझं एकच सांगणं आहे. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत- जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही! असं राज यांनी पत्राच्या शेवटी म्हटलं होतं. राज यांनी हे पत्र ट्विट केलं होतं. राज ठाकरेंनी दीड महिन्यांपूर्वी केलेल्या या ट्विटची आता सोशल मीडियावर चर्चा आहे. अनेकांनी राज ठाकरे यांचे हे पत्र देखील व्हायरल केले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने