ब्युरो टीम : दक्षिण आफ्रिकेने डेव्हिड मिलरच्या धडाकेबाज फटकेबाजीच्या जोरावर भारताला पहिल्याच ट्वेन्टी-२० सामन्यात पराभवाचा धक्का दिला. मिलर हा भारतीय टीमसाठी एकप्रकारे किलरच ठरला. मिलरने तुफानी अर्धशतक झळकावल्यामुळे दक्षिण आफ्रिकेने पहिल्या सामन्यात सात विकेट्स राखत विजय साकारला, व त्याचबरोबर भारताची विश्वविक्रम करण्याची संधीही गेली. कारण भारताने हा सामना जिंकला असता तर त्यांना सलग १३ सामने जिंकत विश्वविक्रम रचता आला असता.
भारताने या सामन्यात टॉस गमावला असला तरी त्यांना प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाली. इशान आणि ऋतुराज गायकवाड यांनी धडाकेबाज सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या पॉवर प्लेमध्ये दणदणीत फटकेबाजी करत भारताला बिनबाद ५१ अशी मजल मारून दिली.
इशान किशनच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने आफ्रिकेपुढे २१२ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेची सुरुवात चांगली झाली नाही. पण त्यानंतर डेव्हिड मिलरने झंझावाती अर्धशतक झळकावले आणि सामन्यात रंगत वाढवली आणि सामनाही संघाच्या बाजूने फिरवला. मिलरने यावेळी ३१ चेंडूंत चार चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर नाबाद ६४ धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली, तर रॅसी व्हॅन डर डुसेनने ४६ चेंडूंत सहा चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर नाबाद ७५ धावा फटकावल्या.
टिप्पणी पोस्ट करा