ब्युरो टीम :गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्र राज्यातील राजकारण एकाच नावाभोवती फिरत आहे, ते म्हणजे शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे. पण तुह्मी हे जाणून आश्चर्य वाटेल की एकनाथ शिंदे यांच्या नावाची चर्चा केवळ महाराष्ट्र किंवा भारतात नाही, तर चक्क पाकिस्तान मध्येही सुरु आहे.
जगभरातील ३३ देशांमध्ये ३ दिवसांत पाच नेत्यांविषयी माहिती सर्च करण्यात आली. त्यात एकनाथ शिंदे सर्वात पुढे होते. शिंदेंविषयी माहिती सर्च करणाऱ्यांमध्ये पाकिस्तानात ५४ टक्के, सौदी अरेबियात ५७ टक्के, मलेशिया ६१ टक्के, नेपाळ ५१ टक्के, बांगलादेश ४२ टक्के, थायलंड ५४ टक्के, जपान ५९ टक्के, कॅनडात ५५ टक्के लोकांनी सर्च केले आहे.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकार ज्यांच्यामुळे धाेक्यात आले ते शिवसेना नेते एकनाथ शिंदे ४५ पेक्षा अधिक आमदारांना घेऊन गुवाहाटीत मुक्कामाला आहेत. या घडामोंडीमुळे संपूर्ण देशात कोण हे एकनाथ शिंदे याविषयी उत्सुकता असून लोक गुगलाच हा प्रश्न विचारत आहेत. या घडामोडी महाराष्ट्राशी संबंधित असल्याने उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, शरद पवार यांच्या तुलनेत देशात शिंदेंचा सर्च ट्रेंड ६४ टक्के आहे. तर शिंदेंनी थेट ठाकरेंनाच आव्हान दिल्याने पाकिस्तान आणि सौदी या मुस्लिम देशांमध्ये गेल्या तीन दिवसांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक लोकांनी शिंदेंविषयी माहिती सर्च केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा