ब्युरो टीम : राज्यसभा निवडणुकीचे निकाल हाती येताच मनसेने शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे. 'शिवसेना ही महाविकास आघाडीतील "ढ"टीम आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाल', असं म्हणत मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी शिवसेनेची खिल्ली उडवली आहे.
राज्यसभेच्या सहा जागांसाठीचे सर्व निकाल हाती आले आहेत. यामध्ये सर्वात चुरशीची समजली जाणारी भाजप धनंजय महाडिक आणि शिवसेनेचे संजय पवार यांच्यामध्ये धनंजय महाडिकांना मोठी विजय प्राप्त झाला आहे. त्यावरुन आता मनसेचे संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय.
शिवसेना ही महाविकास आघाडीतील "ढ"टीम आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. बोरू बहाद्दर कारकून आणि "ढ" टीम चे कप्तान तोंडावर आपटले, असं म्हणत देशपांडे यांनी शिवसेनेच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं आहे.
दरम्यान, शिवसेनेला त्यांच्या गणितांवर पूर्ण विश्वास होता, उमेदवार निवडणूक आणण्यासाठी त्यांनी हॉटेल मॅनेजमेंट, अपक्षांची जुळवाजुळव, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मतांची जोड अशी कुठलीही कमी ठेवली नाही. मात्र, त्यावर फडणवीसांची खेळी मास्टर स्ट्रोक ठरली आणि धनंजय महाडिक हे ८ मतांनी विजयी झाले.
टिप्पणी पोस्ट करा