शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत का वाचली राष्ट्रीय पक्षांची यादी ? जाणून घ्या कारण

ब्युरो टीम :  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद  पवार यांनी आज पत्रकार परिषद  घेतली. यावेळी त्यांनी राष्ट्रीय पक्षांची  यादी वाचून  दाखवल्यानं त्याची जोरदार चर्चा सुरु  झाली आहे. यामागचे  कारण ही तसेच आहे.

एकनाथ शिंदे यांचा व्हिडिओ टेलिव्हिजनवर पाहिला आहे. त्यामध्ये ते राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा आहे असं म्हणाले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदमध्ये शरद पवारांनी थेट देशातील राष्ट्रीय पक्षांची यादी वाचून दाखवली, व ते म्हणाले सहा राष्ट्रीय पक्षापैकी  सीपीएम, सीपीआय, काँग्रेस, राष्ट्रवादी यांचा पाठिबा त्यांना नाही, तर आहेत कोण हे सांगायची गरज नाही. सूरत आणि आसामला जी व्यवस्था करणारी लोक दिसली, ती अजित पवारांच्या परिचयाचे आहेत, असं मला वाटत नाहीत. पण ते माझ्या परिचयाचे आहेत, असे सांगतानाच त्यांनी एक प्रकारे भाजप  या सर्व प्रकारामागे असल्याचे सांगितले.
यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील सत्ता संघर्षावर  थेट भाष्य केलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडाला कुणाचा पाठिंबा आहे, हे शरद पवारांनी त्यांच्या खास शैलीत उघड केलं आहे. महाविकास आघाडी सरकारचा प्रयोग फसला असं नाही, असं शरद पवार म्हणाले. अडीच वर्ष महाविकास आघाडीनं उत्तम कारभार केला, अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. करोना संकटाच्या काळात आरोग्य खात्यानं चांगलं काम केलं, असं असताना महाविकास आघाडीचा प्रयोग फसलाय असं म्हणतात हे राजकीय अज्ञान आहे, असंही शरद पवार म्हणाले.
राज्याच्या बाहेर गेलेले नेते परत येतील, त्यावेळी ते शिवसेनेला मतदान करतील, असं शरद पवार म्हणाले. सरकार अल्पमतात आहे की नाही, हे ठरवण्याचा अधिकार विधानसभेला आहे. विधानसभेत हे सरकार बहुमतात आहे, हे स्पष्ट होईल, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने