राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची आज होणार घोषणा

मराठी प्रिंट टीम :
देशाचं लक्ष लागलेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर होणार आहे. राष्ट्रीय निवडणूक आयोग आज दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद घेत आहे. यावेळीच राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे आता ही निवडणूक नेमकी केव्हा होणार, याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.  
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ लवकरच संपणार असून आता राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे वेध लागले आहे. रामनाथ कोविंद यांनी २५ जुलै २०१७ मध्ये राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली होती. त्यांचा कार्यकाळ जुलैमध्ये संपत आहे. त्यामुळे त्यांच्या जागी नव्या राष्ट्रपतीपदाची शोधाशोध सुरू आहे.
कोविंद यांना पुन्हा एकदा राष्ट्रपतीपदाची संधी मिळणार की इतर कुणाला राष्ट्रपतीपदाची संधी दिली जाणार, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागले आहे. भाजपच्या एकूण राजकीय रणनीतीनुसार राष्ट्रपतीपदासाठी अनपेक्षित नावही पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राष्ट्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करणार असल्याचं सांगितलं आहे. आज दुपारी तीन वाजता ही पत्रकार परिषद होणार असल्याचं आयोगानं म्हटलं. नवी दिल्लीच्या विज्ञान भवनाच्या हॉल नंबर पाच मध्ये ही पत्रकार परिषद होणार आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने