मुंबई : हवामान खात्याकडून एक आनंदाची बातमी देण्यात आली आहे. पुढच्या ४८ तासांमध्ये मध्य अरबी समुद्राचा काही भाग, गोवा, दक्षिण महाराष्ट्राचा काही भाग, कर्नाटकचा आणखी काही भागात मान्सून पुढे सरकरण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. त्यामुळे पुढच्या दोन दिवसांमध्ये राज्यात मान्सूनचं आगमन होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.
राज्यात सगळ्यांना मान्सूनची प्रतिक्षा असतानाच हवामान खात्याकडून ही आनंदाची बातमी देण्यात आली आहे.
आयएमडी (IMD) ने दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या २ दिवसांमध्ये महाराष्ट्र, संपूर्ण कर्नाटक, आंध्र प्रदेशचा अधिक भाग आणि पश्चिम बंगालच्या उपसागराच्या अधिक भागांमध्ये मान्सून पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल असून यावेळी ढगाळ वातावरण असेल. तर वादळी वाऱ्यासह काही भागांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून मान्सूनची प्रतीक्षा आहे.
टिप्पणी पोस्ट करा