ब्युरो टीम : 'राज्य सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नसल्याचं वक्तव्य
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
रामदास आठवले यावेळी म्हणाले आहेत. 'हे सरकार अल्पमतात आलं आहे. त्यामुळे सरकारला सत्तेवर राहण्याचा कोणताही अधिकार नाही. कारण ३७ आमदार शिंदेंसोबत आहेत. त्यामुळे मोठा गट शिंदेंसोबत आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार, अजित पवार यांनी आमच्याकडे बहुमत आहे अशी भूमिका मांडणं अयोग्य आहे. आपल्याला बहुमत सिद्ध करण्याचा अधिकार आहे. पण इतके आमदार वेगळे झालेले असताना बहुमत असूच शकत नाही. त्यामुळे या सरकारला निर्णय घेण्याचा कोणताही अधिकार नाही,' असं ते म्हणाले.
टिप्पणी पोस्ट करा