शिंदे समर्थक आक्रमक ! एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानाबाहेर शक्तिप्रदर्शन

ब्युरो टीम :  बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ ठाण्यात हजारो लोक जमले आहेत. 'आम्ही भाई समर्थक', असे पोस्टर्स कार्यकर्त्यांनी हातात घेतलेले आहेत. 'नेता कैसा हो, एकनाथ शिंदे जैसा हो..', 'एकनाथ भाई तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हो', अशा घोषणांनी ठाणे दुमदूमून गेलं होतं. एकनाथ शिंदे यांना समर्थन देण्यासाठी ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के, शिवसेनेचे अनेक नगरसेवक, सेना पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी शिंदे  यांचे  पुत्र श्रीकांत शिंदे  यांनी आक्रमक भाषण  केले. ते म्हणाले,  प्रामाणिक शिवसैनिकांची माथं भडकविण्याचं काम सुरु आहे. ४ लोक ऑफिसवर दगड फेकतात. हिम्मत असेल तर समोर या, असं आव्हान एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी दगडफेक करणाऱ्या सेना कार्यकर्त्यांना दिलं. शिंदेसाहेबांमुळे आपण शांत आहोत. इथे मोगलाई माजली काय? हा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रात धमक्या खपवून घेतल्या जाणार नाही. आम्ही आनंद दिघे यांच्या विचारांनी चालतो, असं म्हणत एकप्रकारे त्यांनी शिवसेनेला आणि पर्यायने उद्धव ठाकरे यांनाच आव्हान दिलं. तसंच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर जवळपास ५० आमदारांचा विश्वास आहे. एवढ्या सगळ्या आमदारांनी त्यांच्यावर विश्वास का ठेवला, याचा पक्षनेतृत्वाने विचार करावा, असंही श्रीकांत शिंदे उद्धव ठाकरेंना उद्देशून म्हणाले

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने