महाराष्ट्राच्या सत्तानाट्यात ममतादीदींची एन्ट्री



ब्युरो टीम : शिवसेनेचे  बंडखोर  नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनाविरोधात बंड पुकारल्यानंतर राज्यासह देशातील राजकारणात वादळ निर्माण झालं आहे. महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्याचा हा भाजपचा डाव असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. आता  यामध्ये तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बँनर्जी यांनीही उडी घेतली  आहे. बंडखोर आमदारांना पश्चिम बंगालमध्ये पाठवून द्यायला हवे. आम्ही योग्य तो पाहुणचार करु, असा टोला ममता बँनर्जी लगावला आहे.
आम्हाला उद्धव ठाकरे आणि सर्वांनाच न्याय मिळवून द्यायचा आहे. आज भाजपा सत्तेत आहे. तुम्ही पैसा, ताकद आणि माफियाची शक्ती वापरत आहेत. पण एक दिवस तुम्हालाही जावं लागेल. कोणीतरी तुमचा पक्षही फोडेल. हे चुकीचं आहे. मी या गोष्टीचा पाठिंबा देत नाही. आसामऐवजी त्या बंडखोर आमदारांना बंगालला पाठवा. आम्ही त्यांचा चांगला पाहुणचार करु. महाराष्ट्रानंतर ते इतर सरकारनांही धक्का देतील. आम्हाला लोकांसाठी संविधानासाठी न्याय हवा आहे, असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, शिवसेना नेते एकनाथ शिंदे  यांनी पक्षाविरोधात पुकारलेल्या बंडानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. सरकार वाचवण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते शर्थीचे प्रयत्न करत आहेत. तर, शिंदे गट आपल्या भूमिकेवर ठाम असून आघाडी सरकारला जोरदार प्रत्युत्तर देत आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने