हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या 'त्या' लेखाची आठवण




ब्युरो टीम : महाराष्ट्रात सुरू असलेल्या सध्याच्या राजकीय घडामोडीनंतर आणि त्यातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कालच्या फेसबुक लाईव्ह नंतर अनेकांना आठवण झाली ती हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी १९९२ मध्ये सामना या शिवसेनेच्या मुखपत्र असणाऱ्या वर्तमानपत्रातून लिहिलेल्या लेखाची.

बाळासाहेब ठाकरेंच्या त्या लेखानंतर एकच खळबळ उडाली. शिवसैनिकांनी आंदोलन सुरु केले काहींनी आत्महत्येची धमकी दिली. त्या लेखानंतर एक वेगळीच मोहीम सुरू झाली, ज्यात बाळासाहेबांचे मन वळवण्याचा प्रयत्न सुरू झाला. तुमच्या शिवाय शिवसेना असू शकत नाही, असे म्हंटल जाऊ लागले. शिवसेना भवनाच्या बाहेर लाखो शिवसैनिक बाळासाहेबांच्या समर्थनात घोषणा देऊ लागले.
पण, हा लेख  बाळासाहेब ठाकरे यांना का लिहावा लागला, ते जाणून घेउयात. शिवसेनेच्या नाराज आमदारांनी आता ज्या कारणामुळे बंडखोरी केली आहे, त्यामध्ये उद्धव ठाकरे कोणाला भेटत नाही, तसेच शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे, अशी त्यांची मागणी आहे. १९९२ साली बाळासाहेब ठाकरे यांच्यावर देखील अशाच प्रकारची टीका झाली होती. तेव्हा माधव देशपांडे यांनी बाळासाहेब आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. देशपांडे उद्धव आणि राज ठाकरे यांच्यावर देखील हल्ला चढवला होता. उद्धव आणि राज पक्षाच्या निर्णयात हस्तक्षेप करतात, असा आरोप देशपांडे यांनी केला होता. कुटुंबावर अशा प्रकारचे आरोप झाल्यानंतर बाळासाहेबांनी सामनातून एक लेख लिहला होता. एक शिवसैनिक जरी माझ्या किंवा माझ्या कुटुंबाच्या विरोधात असेल तर आणि तो म्हणत असेल की तुमच्यामुळे मी पक्ष सोडतोय, तर याच क्षणी मी शिवसेनेचे अध्यक्षपद सोडतो. माझे संपूर्ण कुटुंबीय शिवसेना सोडली. बाळासाहेब ठाकरेंच्या त्या लेखानंतर एकच खळबळ उडाली. शिवसैनिकांनी आंदोलन सुरु केले काहींनी आत्महत्येची धमकी दिली. त्या लेखानंतर एक वेगळीच मोहीम सुरू झाली ज्यात बाळासाहेबांचे मन वळवण्याचा प्रयत्न सुरू झाला. तुमच्या शिवाय शिवसेना असू शकत नाही. शिवसेना भवनाच्या बाहेर लाखो शिवसैनिक बाळासाहेबांच्या समर्थनात घोषणा देऊ लागले.
शिवसेनेने अनुभवलेल्या १९९२ मधील घटनेनंतर पक्षाविरोधात कोणी आवाज उठवला नव्हता. आता उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवून पुन्हा एकदा पक्ष संघटनेला एकत्र करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने