ब्युरो टीम : शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. नाराज असलेले एकनाथ शिंदे शिवसेना आमदारांसह आधी सुरत तर आता गुवाहाटीमध्ये पोहोचले आहेत. गुवाहाटीला पोहोचल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी बंडामागची भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे आहोत, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. त्यातच आता एकनाथ शिंदे यांच्या समर्थनात शिवसेनेचे आणखी ३ आमदार गुवाहाटीमध्ये दाखल झाल्याची माहिती मिळतेय. पोलिसांच्या बंदोबस्तात या ३ आमदारांनी हॉटेलमध्ये प्रवेश केला. मात्र, हे तीन आमदार नेमके कोण आहेत हे अद्याप कळू शकलेलं नाही.
एकनाथ शिंदेंना समर्थन देणाऱ्या शिवसेना आमदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत जाताना दिसत आहे. माझ्यासोबत सध्या शिवसेनेचे ४० आमदार असून आणखी १० आमदार येणार असल्याचा दावा शिंदे यांनी केला होता. त्यातच शिवसेनेचे आणखी ३ आमदार एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ गुवाहीटमध्ये दाखल झाल्यानंतर शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची संख्या वाढून ४३ वर गेली आहे. ५५ आमदार संख्या असलेल्या शिवसेनेचे खरच ४३ आमदार एकनाथ शिंदेसोबत असतील तर शिवसेनेसमोर मोठी समस्या निर्माण होऊ शकते.
टिप्पणी पोस्ट करा