ब्युरो टीम : ‘उद्या मुंबईत आल्यानंतर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरही जाणार, छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर आनंद दिघेंनाही वंदन करणार. ही बाळासाहेब ठाकरेंची, हिंदुत्वाला पुढे नेणारी, आनंद दिघेंचं विचार पुढे नेणारी शिवसेना आहे. महाराष्ट्र हे जनतेचं राज्य असून त्याचा विकास करण्यासाठी, प्रगतीपथावर नेण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेना हा हिंदुत्वाचा मुद्दा पुढे नेत आहे,’ असे स्पष्ट संकेत देत एकनाथ शिंदे यांनी एकप्रकारे शिवसेनेला आव्हानच दिले आहे.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासहित पक्षातील बंडखोर तसंच अपक्षा आमदारांनी गुवाहाटीमधील कामाख्या देवीचं दर्शन घेतलं आहे. एकनाथ शिंदे उद्या आमदारांसहित मुंबईसाठी रवाना होणार असून त्याआधी त्यांनी देवीचं दर्शन घेतलं. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडे बहुमत असल्याचा दावा केला. तसंच मुंबईत आल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाणार असल्याचंही म्हटलं आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले,’ उद्या आम्ही सर्व आमदार मुंबईत पोहोचणार आहोत. आमच्याकडे ५० लोक असून बहुमत आहे. आमच्या गटाकडे बहुमत आहे त्यामुळे आम्हाला बहुमत चाचणीची चिंता नाही. जी प्रक्रिया असेल त्यात आम्ही जिंकू. आम्हाला कोणीही रोखू शकत नाही. लोकशाहीत क्रमांक आणि बहुमताला महत्व असतं. या देशात संविधान, कायदा आणि नियमाच्या पुढे कोणी जाऊ शकत नाही.’
टिप्पणी पोस्ट करा