ब्युरो टीम : ‘सरकारमध्ये राहणं, पडणं, राजीनामा देणं या सगळ्या गोष्टी आम्हाला, शरद पवारांना काही नवीन नाही. मध्यावधी लागू होऊ दे अथवा काहीही राजकीय पक्षाने नेहमीच निवडणुकीसाठी तयार राहिलं पाहिजे,’ असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी राज्यातील राजकीय स्थितीवर बोलताना केले आहे. तर, ‘पंतप्रधान देहूमध्ये संत तुकारामाच्या भेटीला आले आणि एकनाथाला घेऊन गेले,’ असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
छगन भुजबळ पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर पोहोचले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. संजय राऊतांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीच्या दिशेने असं ट्वीट करत सरकार पडण्याचे संकेत दिले आहेत. भुजबळांना याबाबत विचारण्यात आलं असता त्यांनी आपण अद्याप हे ट्वीट पाहिलं नसल्याचं म्हटलं. तसेच आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काही महत्वाची भूमिका घेतली असं वाटत नसल्याचंही छगन भुजबळ म्हणाले आहेत. राजकीय पक्षाने नेहमीच निवडणुकीसाठी तयार राहिलं पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
टिप्पणी पोस्ट करा