ब्युरो टीम : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाला वाढता प्रतिसाद मिळत आहे. आज शिंदे समर्थक आमदारांची संख्या सातने वाढली आहे. दीपक केसरकर, दादा भुसे, मंगेश कुडाळकर, आशिष जैस्वाल, मंगेश कुडाळकर, सदा सरवणकर, संजय राठोड गुवाहाटीत पोहोचले आहेत. यातील जैस्वाल हे शिवसेनेच्या समर्थनानं निवडून आलेले आहेत. तर बाकीचे सहा आमदार सेनेचे आहेत. यानंतर आता शिंदे विधानसभा उपाध्यक्षांना पत्र लिहिणार असल्याचं कळतं.
आपला गट हाच शिवसेना विधिमंडळ पक्ष असल्याचा दावा शिंदेंकडून करण्यात येईल. त्याला मान्यता मिळाल्यास राज्यात नवं सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा होईल. तसं झाल्यास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे फारसे पर्याय उरणार नाहीत.
दरम्यान, सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन करायचे की नाही, यापेक्षा शिवसेना हा मूळ पक्ष आणि पक्षाचं धनुष्यबाण हे चिन्ह आपल्याच गटाकडे कसं येईल, यासाठीच्या कायदेशीर लढाईवर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी लक्ष केंद्रित केलं आहे. पक्षाचे दोन तृतीयांश आमदार माझ्यासोबत आहेत. त्यामुळे माझ्यासोबत असलेला गट हाच शिवसेना विधिमंडळ पक्ष असा दावा शिंदे यांच्याकडून केला जाऊ शकतो. त्यासाठी विधानसभेच्या उपाध्यक्षांना पत्र पाठवण्यात येणार असल्याचं समजतं.
टिप्पणी पोस्ट करा