मतमोजणी थांबल्यामुळे संजय राऊतांचा हल्लाबोल, म्हणाले हा तर....

ब्युरो टीम : राज्यसभा निवडणुकीत मतदान संपल्यानंतरही पुन्हा ट्विस्ट आलाय. महाविकास आघाडीच्या तीन मतांवर भाजपने आक्षेप घेत ही मतं बाद केली जावीत, अशी मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहून केली आहे. त्यामुळे सायंकाळी ५ वाजता सुरु होणारी मतमोजणी अद्यापही सुरु झालेली नाही. गेली २ तास ही मतमोजणी रखडली आहे. त्यामुळे शिवसेना नेते संजय  राऊत यांना भाजप  वर जोरदार टीका केलीय.
राऊत यांनी ट्वीट करीत भाजपवर  निशाणा  साधलाय. त्यात त्यांनी म्हंटले आहे  की, 'राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी का व कोणी थांबवली आहे? ईडी चा डाव फसला! आता रडीचा डाव सुरू झाला!! आम्हीच जिंकू! जय महाराष्ट्र!!, असेही राऊत यांनी स्पष्ट केलय.
दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने जितेंद्र आव्हाड, सुहास कांदे आणि यशोमती ठाकूर मतदान करतानाचे व्हिडिओ मागवून घेतले आहेत. राज्यसभा निवडणुकीची मतपत्रिका भरल्यानंतर संबंधित आमदाराने आपल्या गटाच्या नेमून दिलेल्या प्रतिनिधीला आपली मतपत्रिका दाखवणे आवश्यक आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आपली मतपात्रिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना दाखवण्याऐवजी ती त्यांच्या हातात दिली. तर यशोमती ठाकूर यांनीही आपली मतपत्रिका नाना पटोले यांच्या हातात दिली. शिवसेना आमदार सुहास कांदेंनी देखील तीच चूक केली. त्यामुळे मविआच्या तीनही आमदारांचं मत बाद केलं जावं, अशी मागणी भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहून केली आहे. 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने