बापरे! शिवसेनेचे १५ नव्हे जास्त आमदार फुटणार? आता 'या' आमदाराच्या व्हॉटसअ‍ॅप डीपीवर एकनाथ शिंदेंचा फोटो

ब्युरो टीम : विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर आता ठाकरे सरकारला हादरे बसायला सुरुवात झाली आहे. कारण, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आपल्या ११ समर्थक आमदारांसह नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे हे आपल्या गटातील आमदारांना घेऊन गुजरातमधील एका हॉटेलमध्ये मुक्कामाला असल्याची माहिती आहे. मात्र, आता शिवसेनेचे आणखी काही आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे शिवसेनेतून १३ पेक्षा जास्त आमदार फुटू शकतात, अशी भीती राजकीय जाणकारांकडून वर्तविली जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, औरंगाबाद जिल्ह्यातील शिवसेनेचे सहा आमदार सध्या नॉट रिचेबल आहेत. तर काही वेळापूर्वीच बुलढाण्यातील शिवसेनेचे आमदार संजय रायमूलकर आणि संजय गायकवाड हेदेखील नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. हे दोन्ही आमदार एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. संजय रायमूलकर यांनी काहीवेळापूर्वीच Whatapp च्या डीपीवर एकनाथ शिंदे यांचा फोटो लावला आहे. त्यामुळे हे दोन्ही आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत जातील, असे सांगितले जात आहे. तसेच सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील आणि अकोल्याच्या बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख हेदेखील नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे १३ नव्हे तर त्यापेक्षा जास्त आमदार जाऊ शकतात. तसे घडल्यास शिवसेना अक्षरश: खिळखिळी होईल. त्यामुळे आता उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे प्रमुख नेते ही गळती कशी रोखणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत सूरतच्या हॉटेलमध्ये कोणते आमदार?

एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे इतर दोन मंत्रीही गुजरातमध्ये दाखल झाले आहेत. यामध्ये गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा समावेश आहे. तसंच बालाजी किणीकर, संजय शिरसाट, शांताराम मोरे, महेंद्र दळवी आणि नाशिक व औरंगाबाद जिल्ह्यातील काही आमदार हे शिंदे यांच्यासोबत सुरतमध्ये निघून गेले आहेत.

एकनाथ शिंदेंसह संभाव्य नॉट रिचेबल आमदारांची यादी 
1. शहाजी बापू पाटील   2. महेश शिंदे सातारा

3. भरत गोगावले

4. महेंद्र दळवी

5. महेश थोरवे

6. विश्वनाथ भोईर

7. संजय राठोड

8. संदीपान भुमरे

9. उदयसिंह राजपूत



10. संजय शिरसाठ

11. रमेश बोरणारे

12. प्रदीप जैस्वाल

13. अब्दुल सत्तार

14. तानाजी सावंत

15. सुहास कांदे

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने