डॉ.प्रकाश आमटे पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल


पुणे : ज्येष्ठ समाजसेवक डॅा. प्रकाश आमटे यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. डॅा. आमटे यांचे चिरंजीव अनिकेत आमटे यांनी फेसबुक पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. आजाराचे निदान करण्यासाठी तपासण्या आणि उपचार सुरु असून उपचारांना ते प्रतिसादही देत आहेत. सध्या डॅाक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला आहे, असेही अनिकेत आमटे यांनी म्हंटले  आहे.
डॅा. आमटे हे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या दीक्षांत समारंभासाठी पुण्यात आले असता त्यांना ताप आणि खोकल्याचा त्रास जाणवला. म्हणून त्यांना  दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये  दाखल करण्यात आले आहे. डॅा. आमटे यांचे चिरंजीव अनिकेत आमटे यांनी सोशल मीडियातून ही माहिती दिली. अनिकेत आमटे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हंटले आहे की, “डॉक्टर प्रकाश आमटे हे ८ जून रोजी पुणे येथे बीजे मेडिकल कॉलेजमध्ये दीक्षांत समारंभाला आले असता त्यांना जास्त ताप व खोकल्याचा त्रास झाला म्हणून एका खासगी रुग्णालयात उपचार व तपासण्या सुरू आहेत व पूर्ण विश्रांतीचा डॉक्टरांनी सल्ला दिला आहे. आज उपचाराला थोडा प्रतिसाद मिळाला आहे. कदाचित ‘Lukemia’ ची शक्यता आहे. त्या साठी पुढील तपासण्या सुरू आहेत. सर्वांना नम्र विनंती आहे की सध्या त्यांना फोन/मेसेज करू नये. भेटायला येऊ नये. लवकरच ते ठणठणीत बरे होतील यासाठी आपण सर्व प्रार्थना करूया. अधिक माहिती नितीन पवार देतील. ”

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने