आजच फडणवीस व शिंदे यांचा शपथविधी



ब्युरो टीम : आज संध्याकाळी ७ वाजता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून तर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. राजभवनातील 'दरबार हॉल'मध्ये शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे. सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे.
एकनाथ शिंदे हे काहीवेळापूर्वीच मुंबईत दाखल झाले आहेत. यानंतर ते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याच्या दिशेने रवाना झाले आहेत. सागर बंगल्यावर रविंद्र चव्हाण, पराग अळवणी, मंगलप्रभात लोढा, उदयनराजे भोसले हे भाजपचे प्रमुख नेते दाखल झाले आहेत. येथून हे सर्वजण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे जाऊन सत्तास्थापनेचा दावा करतील. त्यानंतर आज संध्याकाळीच भाजप सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.  यावेळी देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि एकनाथ शिंदे हे तिघेजण शपथ घेऊ शकतात.
दरम्यान, राजभवनातील दरबार हॉलमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडेल. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे पत्रकार परिषद घेत राज्यातील जनतेसोबत संवाद साधतील, अशी माहिती आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने