'हे' कोडे सोडवतांना घाम सुटल्याशिवाय राहणार नाही !


पुणे : तुम्ही शाळेत, कॉलेजमध्ये असताना तुमच्या मित्रांना कोडी घातली असतील. ही कोडी सोडवण्यासाठी पैंज सुद्धा लावली असेल. पण एखादे चित्र पाहून त्यावरून मुलाचे किंवा मुलीचे नाव ओळखण्याचे कोडे तुम्ही कधी सोडवले आहे का ? आज आम्ही तुम्हाला अशाच एका चित्राबद्दल सांगणार आहोत, ज्यावरून तुम्हाला मुलीचे नाव ओळखायचे आहे. हे चित्र सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले आहे. 
प्रत्येक जण स्वतःला हुशार समजतो, परंतु कधी कधी एखादे कोडे सोडवताना बुद्धीचा कस लागतो. अनेक वेळा एखादयाने तुम्हाला कोडे विचारले असेल, पण त्याचे उत्तर तुम्हाला माहीत नसते. बर्‍याचवेळा वाटते की, कोडे खूप सोपे असून ते सहज सोडवता येईल, परंतु अनेकदा साधे कोडे सुद्धा सोडवता येत नाही. आज आम्ही तुमच्यासाठी एक अतिशय सोपे कोडे घेऊन आलो आहोत. मात्र, हे कोडे सोडवणे भल्याभल्यांना जमले नाही. हे कोडे एका चित्राशी संबंधित आहे. चित्रामध्ये शंभर रुपयांची नोट व एक नळ दिसत आहे. हे चित्र सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून ते पाहून मुलीचे नाव ओळखायचे आहे. तुम्हाला फक्त हे चित्र काळजीपूर्वक पाहून मुलीचे नाव ओळखायचे आहे.

नेमकं काय आहे उत्तर ?

हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चित्र नीट बघूनही अनेकांना मुलीचे नाव सांगता येत नाही. तुम्ही पण फोटो नीट बघा, आणि 10 सेकंदात तुम्हाला त्या मुलीचे नाव ओळखता आले तर कमेंट करा. पण लक्षात ठेवा की, हे नाव तुम्हाला 10 सेकंदात ओळखायचे आहे. वेळेत जर तुम्ही मुलीचे नाव सांगू शकला नाहीत, तर तुम्ही हारलात, हे मान्य करा. मुळात हे कोडे खूप सोपे आहे. चित्रात एक शंभर रुपयांची नोट व एक नळ दाखवण्यात आलाय. शंभर रुपयांच्या नोटेतून 'सो' आणि नळातून 'नल' हा शब्द घ्यावा. आता दोन्ही शब्द  जोडल्यानंतर पूर्ण नाव सोनल झाले आहे. अशा प्रकारे या साध्या प्रश्नाचे उत्तर 'सोनल' आहे. सोनल हे खूप सामान्य नाव आहे हेही तुम्हाला माहीत आहे. आता ही गोष्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि त्यांच्या बुद्धीची परीक्षा घ्या.

हे कोडे सोडवताना बहुतांश लोकांचा घाम सुटला. 99 टक्के लोकांना या साध्या कोड्याचे उत्तर देता आलेले नाही. या कोड्याचे अचूक उत्तर फार कमी लोक देऊ शकले. कोडी कोणत्याही भाषेतील असोत, ती सोडवताना बुद्धीचा चांगलाच कस लागतो. पण यामुळे बुद्धीला चालना मिळते. अर्थात याकडे टाइमपास म्हणून पाहायचे की बुद्धीचा खेळ म्हणून हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने