शिवसैनिक भडकले तर.... संजय राऊत थेट बोलले



ब्युरो टीम : ‘शिवसेना हा पक्ष कोणाला हायजॅक करता येणार नाही. बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की हजारो शिवसैनिक माझ्या पाठिशी आहेत, म्हणून मी शिवसैनिक आहे. आज हे हजारो शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या पाठिशी आहेत. सांगलीतले शिवसैनिक इथे आले आहेत. फक्त आदेशाची वाट पाहात आहेत. ते भडकले तर आग लागेल,’ असा इशाराच शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिला आहे. 
आज सकाळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना संजय राऊतांनी हे वक्तव्य केले. यावेळी एकनाथ शिंदे यांचे बंड, विरोधकांची भूमिका आणि शिवसेनेची आगामी वाटचाल या सर्व मुद्द्यांवर भूमिका मांडली. ते म्हणाले, ‘या पक्षाला उभं करण्यात आम्ही प्रचंड मेहनत घेतली आहे. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, सगळे कार्यकर्ते यांनी मेहनत घेतली आहे. हा पक्ष इतक्या सहज कुणी हायजॅक करू शकत नाही. विचारही करू शकत नाही. आमच्या रक्ताने हा पक्ष तयार झाला आहे. शेकडो लोकांनी या पक्षासाठी बलिदान दिलं आहे. फक्त पैशाच्या जौरावर कुणी पक्ष खरेदी करू शकत नाही. आजच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत यावर चर्चा होईल. सध्याच्या संकटाला आम्ही संकट मानत नाही तर पक्षविस्ताराची संधी मानतो,’ असं राऊत म्हणाले होते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने