ब्युरो टीम :
जालन्यात आज भाजपने 'जलआक्रोश मोर्चा'चं आयोजन केलं होतं. जालन्याचे हजारो नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते. जलआक्रोशात मोर्चावेळी वरुणराजाने हजेरी लावली. यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शाब्दिक कोटी करीत राज्य सरकावर निशाणा साधला. फडणवीस म्हणाले, ‘सरकार कुठे चाललंय?, मुख्यमंत्री कार चालवतात, अन् सरकार भगवान चालवतं. ईश्वर भरोसे चाललंय सगळं. आम्ही पाणी मागायला आलो. मुख्यमंत्र्यांनी पाणी दिलं नाही. पण ईश्वराने पाणी दिलं.’ दरम्यान, मराठवाडा पाणी प्रश्नावरून भाजप चांगलंच आक्रमक झालं आहे. औरंगाबादनंतर आज जालन्यात भाजपने जल आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं होतं.
जालन्यातील 'जलआक्रोश मोर्चा'चं निमित्ताने आयोजित सभेत देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे, संतोष पाटील दानवे यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. फडणवीस म्हणाले, ‘मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर ठाकरे सरकार गंभीर नाही. ठाकरे सरकारमुळे अनेक पाण्याच्या योजना रखडल्या, या सरकारने मराठवाडा वॉटर ग्रीडचा खून केला, पहिल्यांदा सांगितलं की ही योजना रद्द केली नाही, नंतर एकही रुपयाचा निधी दिला नाही. पण मी आज या मोर्चाचा निमित्ताने सांगू इच्छितो, जोपर्यंत सरकार जनतेला पाणी देत नाही, तोपर्यंत यांना आम्ही झोपू देणार नाही. जर मराठवाडा वॉटर ग्रीड योजना झाली असती तर मराठवाड्यात कधीही पाणी टंचाई निर्माण झाली नसती. हे सरकार पाण्याचा शत्रू आहे. सगळ्या पाण्याच्या योजनांची ठाकरे सरकारने हत्या केलीय. मविआ सरकारने वैधानिक विकास महामंडळाची हत्या केली. सरकारमध्ये अनेक मराठवाड्याचे मंत्री आहे. पण एकाही मंत्र्यांने तोंड उघडलं नाही. कारण हे सरकार टक्केवारी वसूलीत खूश आहेत. यांचे खिसे भरायचे चालले आहेत. यांना जनतेचं काही देणंघेणं नाहीये. चालू कामं बंद करण्याचं एवढंच काम सरकार करतंय. जनतेचं काम सोडविण्यासाठी सिंहासन दिलं. ठाकरे सरकारला मिरवण्यासाठी सिंहासन दिलं नाही", अशी टीका फडणवीसांनी केली.
टिप्पणी पोस्ट करा