राष्ट्रवादीने भाजपला दिली क्लिनचिट, अजित पवारांचे हे वक्तव्य वाचाच
ब्युरो टीम : ‘आताच्या घडीला कुठलाही भाजपाचा नेता किंवा मोठा चेहरा तिथं येऊन काही करतोय असं दिसत नाही,’ असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्टपणे सांगितलं. त्यामुळे शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे व इतर बंडखोर आमदारांमागे भाजप नसल्याचे सांगतानाच एकप्रकारे राष्ट्रवादीने भाजपला क्लिनचिट दिली आहे.
राज्यात सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षावरुन राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. एकनाथ शिंदे यांनी स्वपक्षाविरोधात बंड पुकारल्याने राज्यामधील महाविकास आघाडी सरकार पडण्याची भिती व्यक्त केली जात आहे. या बंडामागे भाजपा असल्याचे आरोप शिवसेनेकडून केले जात आहेत. असं असतानाच अजित पवार यांनी यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यशंवतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवारांनी या बंडामागे भाजपा आहे का यासंदर्भातील प्रश्नावर उत्तर दिलंय. अजित पवारांना या बंडामागे भाजपा आहे असं वाटतं का असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना, “अजून तरी तसं काही दिसलं नाही,” असं म्हटलंय. तसेच पुढे बोलताना सरकारचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आमचा पाठिंबा अगदी शेवटच्या क्षणापर्यंत राहणार आहे. हे सरकार टीकवण्याचीच आमची भूमिका शेवटपर्यंत राहील असं अजित पवारांनी सांगितलं.
टिप्पणी पोस्ट करा