फडणवींसाचा कोणता दूत एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेला ? वाचा



ब्युरो टीम : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह २१ आमदार नॉट रिचेबल आहेत. ते सध्या गुजरातच्या सूरतमध्ये वास्तव्याला आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत घरोबा नको. झाला तितका संसार पुरे झाला, अशी शिंदे आणि समर्थक आमदारांची भूमिका आहे. 
दुसरीकडे शिंदे यांच्या बंडामागे भाजप असल्याचं बोललं जात आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेत असताना भाजप आमदार संजय कुटे गुजरातच्या सूरतमध्ये पोहोचले आहेत.
सूरतच्या मेरिडियन हॉटेलमध्ये शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांचा मुक्काम आहे. त्यांच्या भेटीसाठी कुटे पोहोचले. त्यांची पांढऱ्या रंगाची कार हॉटेलबाहेर असलेल्या पोलिसांनी अडवली. यानंतर फोनाफोनी झाली. पोलिसांनी कुटे यांची चौकशी केली. त्यांच्याकडून माहिती घेतली. यानंतर कुटेंची कार आतमध्ये सोडण्यात आली.
दरम्यान, कुटे हे देवेंद्र फडणवीस यांचा निरोप घेऊन हॉटेल मेरिडियनमध्ये गेल्याची चर्चा आहे. भाजप नेते भूपेंद्र यादव आणि मंगलप्रभात लोढा हे संपूर्ण ऑपरेशन हाताळत असल्याची माहिती आहे. त्यांनी सूरतमधील एक फार्म हाऊसदेखील बूक केलं आहे. शिंदे आणि त्यांच्या समर्थकांना त्या फार्म हाऊसवर हलवण्यात येऊ शकतं.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने