ब्युरो टीम : भाजपने त्यांच्या आमदारांना संपर्कात राहण्याचे आदेश दिले आहेत. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे देखील दिल्लीहून मुंबईत दाखल झाले असून सागर बंगल्यावर त्यांची बैठक झाली असून तेथूनच पक्षाच्या सर्व आमदारांना आदेश पाठवण्यात आलेत. पक्षाच्या आमदारांना कोणत्याही क्षणी मुंबईला यावे लागू शकते, असे आदेशात म्हटले आहे.
राज्यातील उद्धव ठाकरे सरकारवरील संकट अधिक गडद होत चालले आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील जवळ जवळ ४० आमदारांच्या बंडाला सामोरे जावे लागत आहे. अशात भाजपने देखील हालचाली सुरू केल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन करण्याच्या हलचाली सुरू केल्या असून भाजपने त्यांच्या १०५ आमदारांना हा महत्त्वाचा आदेश दिलाय.
एका बाजूला मुख्यमंत्र्यांनी राजीनामे द्यावेत अशी मागणी होत असताना दुसऱ्या बाजूला संजय राऊत यांनी ट्विट करून या सत्तासंघर्षात सेनेचा पराभव झाल्याचे मान्य केले आहे. राऊतांनी ट्विट करून, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीचया दिशेने.. असे म्हटले आहे. त्याआधी आदित्य ठाकरे यांनी देखील सोशल मीडियावरील बायोमधून मंत्रीपद काढून टाकले होते.
टिप्पणी पोस्ट करा